छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्याचे संस्थापक आणि मराठ्यांचे अभिमान होते. त्यांनी केवळ तलवारीच्या जोरावरच नाही तर शहाणपण, धाडस आणि लोकांवरील प्रेम यांच्या आधारावर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.
त्यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. लहानपणापासूनच त्यांच्यात पराक्रम, स्वाभिमान आणि स्वराज्याची ज्योत दिसून येत होती. स्वराज्य म्हणजे फक्त सत्ता नव्हे, तर जनतेचे राज्य, जनतेसाठी राज्य ही शिवाजी महाराजांची खरी संकल्पना होती.
शिवाजी महाराज हे उत्तम योध्दा, कुशल प्रशासक आणि लोकनायक होते. त्यांनी गनिमी कावा या तंत्राचा वापर करून मोगल आणि आदिलशाही सरदारांना पराभूत केले. त्यांनी नौदल उभारून समुद्रसंपत्तीचे रक्षण केले.
शिवाजी महाराजांनी नेहमी स्त्रियांना सन्मान दिला, प्रजेला न्याय दिला आणि शेतकऱ्यांचे रक्षण केले. त्यांच्यासाठी प्रत्येक धर्म समान होता.
आजही शिवाजी महाराजांचे विचार, त्यांचे पराक्रम आणि त्यांची शिस्त आपल्याला प्रेरणा देतात.
जय भवानी! जय शिवाजी!

No comments:
Post a Comment